शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गौरव सोहळा पन्नास वर्षांचा... उपस्थिती लक्ष-लक्ष कार्यकर्त्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:10 IST

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा गौरव करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी साताºयात सर्वपक्षीय सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सातारी सत्काराला एक लाख जनता उपस्थित राहावी, यासाठी संयोजकांनी नेटके नियोजन केले आहे.सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येथील विश्रामगृहावर ...

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाले आहेत. याचा गौरव करण्यासाठी सोमवार, दि. १३ नोव्हेंबर रोजी साताºयात सर्वपक्षीय सत्काराचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सातारी सत्काराला एक लाख जनता उपस्थित राहावी, यासाठी संयोजकांनी नेटके नियोजन केले आहे.सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येथील विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, माजी खा. लक्ष्मणराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, माजी आ. प्रभाकर घार्गे, निवृत्त अधिकारी प्रभाकर देशमुख, काँगे्रसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नगरसेवक विजयकुमार काटवटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, शेतकरी संघटनेचे शंकर गोडसे, राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.खासदार शरद पवार यांचा सत्कार सोहळा सोमवार, दि. १३ रोजी जिल्हा परिषद मैदानावर होणार आहे. त्यासाठी स्टेज व पे्रक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रण देण्यात आले आहे. कार्यक्रमास पालकमंत्री विजय शिवतारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला एक लाख लोक उपस्थित राहतील, यासाठी संयोजकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येकाची मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.दोन्ही राजे उपस्थित राहणारगेल्या काही दिवसांपासून साताºयात घडणाºया घडामोडींमुळे सोमवारच्या गौरव सोहळ्यास साताºयाचे दोन्ही राजे उपस्थित राहणार का? याकडे साºयांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शरद पवारांवरील प्रेमापोटी खासदार उदयनराजे भोसले अन् आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोघेही सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्थाजिल्ह्याच्या कानाकोपºयातून लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने शाहू स्टेडियम, पोलिस परेड ग्राउंड, सैनिक स्कूल मैदान व शहरातील इतर मैदानांवर गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.शेतकºयांच्या हस्ते गौरवसंसदीय राजकारणाला पन्नास वर्षे पूर्ण करणाºया खासदार शरद पवार यांच्या सत्काराला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. मात्र, त्यांचा सत्कार जिल्ह्यातील एका शेतकºयाच्या हस्ते करण्याचे नियोजन केले आहे.

टॅग्स :Politicsराजकारण